अमरावती -राज्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी सकाळीच आपल्या कुटुंबासह वरुड येथील महात्मा फुले विद्यालयात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारांने मतदान करावे, असे आवाहन डॉ अनिल बोंडे यांनी यावेळी केले.
कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनीही बजावला मतदानाचा हक्क - कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनीही बजावला मतदानाचा हक्क
राज्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी सकाळीच, आपल्या कुटुंबासह वरुड येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनीही बजावला मतदानाचा हक्क
हेही वाचा... आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघात हल्ला, चारचाकी पूर्णत: जळून खाक
डॉ. अनिल बोंडे हे अमरावतीच्या वरुड मोर्शी मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांच्या समोर आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांचे तगडे आव्हान आहे. या निवडणुकीत डॉ. अनिल बोंडे विजयी झाल्यास त्यांची हॅट्ट्रिक पूर्ण होणार आहे, तर आघाडीचे देवेंद्र भुयार हे विजयी झाल्यास मतदारसंघात एक नवा इतिहास असणार आहे.
TAGGED:
Anil Bonde also voted