महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Abdul Sattar Consoled The Farmer family of Suicide Victim मेळघाटातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचं कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी केले सांत्वन - मेळघाटातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब

अमरावतीच्या मेळघाटातील (Amravati Melghat) लाकटू या गावात एका युवक शेतकऱ्याने आत्महत्या ( Farmer Suicide) केल्याचे वृत्त कळताच कृषी मंत्री (Agriculture Minister) अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) तात्काळ धाव घेऊन या शेतकरी कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन (Consoled Farmer family of Suicide Victim) केले. लाकटू (Laktu suicide case) येथे अनिल ठाकरे (Anil Thackeray suicide case) या वय २६ वर्षीय शेतकऱ्याने गावाजवळ विष प्राशन करून आत्महत्या (Farmer suicide consuming poison) केली. पिकांची नुकसान भरपाई (Compensation for crop damage) मिळाली नसल्याने संबंधित शेतकऱ्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Agriculture Minister Abdul Sattar
कृषीमंत्री अब्दुल सत्तार

By

Published : Sep 1, 2022, 8:38 PM IST

अमरावतीअमरावतीच्या मेळघाटातील (Amravati Melghat) लाकटू या गावात एका युवक शेतकऱ्याने आत्महत्या ( Farmer Suicide) केल्याचे वृत्त कळताच कृषी मंत्री (Agriculture Minister) अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) तात्काळ धाव घेऊन या शेतकरी कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन (Consoled Farmer family of Suicide Victim) केले. लाकटू (Laktu suicide case) येथे अनिल ठाकरे (Anil Thackeray suicide case) या वय २६ वर्षीय शेतकऱ्याने गावाजवळ विष प्राशन करून आत्महत्या (Farmer suicide consuming poison) केली. पिकांची नुकसान भरपाई (Compensation for crop damage) मिळाली नसल्याने संबंधित शेतकऱ्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

मदत मिळवून देण्याची ग्वाही(Guarantee to get help)लाकटू येथे अनिल ठाकरे या वय २६ वर्षीय शेतकऱ्याने गावाजवळ विष प्राशन करून आत्महत्या केली. मेळघाट दौऱ्यावर असताना या घटनेची माहिती मिळताच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ लाकटूकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. शासन ठाकरे कुटुंबीयांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे. त्यांना शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही सत्तारांनी दिली.

नुकसान भरपाई मिळाली नसल्याने घेतला टोकाचा निर्णय(Compensation for crop damage) यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्यापही कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले नाही. शासनाकडून शेतकऱ्यांना कुठलीही आर्थिक मदत मिळाली नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या अनिल ठाकरे या आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा Farmer Women Murder मेळघाटात शेतकरी महिलेची बलात्कारानंतर हत्या; आरोपीला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details