अमरावती- ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रसह अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडला होता. यात जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये सुमारे ३ लाख ७३ हजार ५५० हेक्टर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे वरूड तालुक्यामध्येही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कृषी विभागाच्या नुकसान अहवालात वरूड तालुक्याला डावलल्याचे समोर आले आहे.
ओक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून नुकसान अहवाला काढण्यात आला आहे. मात्र, त्यात वरूड तालुक्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संत्रा पिकाची गळ व कापूस, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असताना सुद्धा कृषी विभागाच्या अहवालात वरूड तालुक्यात ० टक्के नुकसान झाल्याचे समोर आले आहे. हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे.