अमरावती -शेतीच्या बांधावर बैल चारण्यातून झालेल्या वादात एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. यानंतर आरोपीने दगडाने ठेचून तिची हत्या केली. या घटनेमुळे मेळघाटात खळबळ उडाली आहे. धारणी तालुक्यातील बिरोटी या Rape and murder woman in Biroti village Dharni गावात बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही अश्लील घटना घडली. याप्रकरणी मृताच्या पतीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली असून, धारणी पोलिसांनी खून व बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. सचिन उर्फ रम्मू शिवलाल दारसिंभे २६ असे आरोपीचे नाव आहे.
हत्या करून आरोपीने काढला पळ :मेळघाटातील बिरोटी गावात ५१ वर्षीय मृत महिलेची शेती आहे. तर आरोपी सचिनची देखील तेथे शेती आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ८ च्या आसपास ती महिला शेतात आली. तेथे शेतीच्या धुऱ्यावर बैल चारण्याच्या कारणावरून आरोपी सचिन व तिच्यात वाद झाला. झटापट झाली. त्यादरम्यान, सचिनने शेताच्या धुऱ्यावर तिच्यावर बलात्कार केला. तिने प्रचंड प्रतिकार केला. मात्र, तो प्रतिकार मोडून काढत त्याने तिची दगडाने ठेचून हत्या केली. तिचा खून केल्यानंतर आरोपीने तिला धुऱ्यावर निर्वस्त्र टाकून पळ काढला.