अमरावती -एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचारी स्वयंस्फूर्तीने गत अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. (ST Workers Strike) या आंदोलनात अनेक कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले असताना परिवहनमंत्री अनिल परब त्यांना आंदोलन मागे घ्या आम्ही योग्य निर्णय घेऊच, असा जो काही सल्ला देत आहे तो योग्य नाही. एसटी कर्मचारी आपल्या मागण्या पूर्ण होईस्तोवर आंदोलन सुरूच ठेवणार आणि या आंदोलनासमोर सरकारला झुकावेच लागणार, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे. (Navneet Rana on ST Workers Strike)
एसटी संपावर बोलताना खासदार नवनीत राणा कर्मचाऱ्यांचे आंदोलन वाया गेले का?
योग्य न्याय मिळावा, यासाठी महिनाभरापासून एसटी कामगार संपावर आहेत. आंदोलन करीत आहेत. अनेकांचे प्राण या आंदोलनात गेले असताना आज बैठकीतून बाहेर पडताना परिवहन मंत्री अनिल परब हे एसटी कामगारांना आंदोलन मागे घ्या, असा सल्ला देत आम्ही लवकरच निर्णय घेऊ असे जे काही बोलत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे एसटी कामगारांचे आजपर्यंतचे आंदोलन वाया गेले गेले का, असा प्रश्न खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला देण्याऐवजी योग्य न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा -st workers strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्रीवर बैठक