अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव -चांदtर रेल्वे मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप यांची गाडी अडवून ग्रामस्थांनी गाडीसमोरच ठिय्या आंदोलन केले आहे. आमदार जगताप हे मतदारसंघातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निंभोरा या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजनाला काल(रविवारी) जात असताना काही गावकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली.
VIDEO - काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगतापांची गाडी अडवली; संतप्त ग्रामस्थांचा गाडीसमोरच ठिय्या - काँग्रेस आमदार विरेंद्र जगताप
आमदार जगताप हे मतदारसंघातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निंभोरा या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील सौंदर्यकरणाच्या भूमिपूजनाला काल(रविवारी) जात असताना काही गावकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली.

काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगतापांची गाडी अडवली
काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगतापांची गाडी अडवली
हेही वाचा - छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत, तर आदेश द्यायचा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, आमदार विरेंद्र जगताप यांच्या गाडीसमोर रस्त्यावरच नागरिकांनी ठिय्या मांडल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गाडी अडवणारे हे गावातील समाजकंटक असून आम्ही त्यांना न जुमानता भूमिपूजन केल्याची प्रतिक्रिया अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाने यांनी दिली.