अमरावती- उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे तरुणीवर नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला होता. तिच्यासह तिच्या वकिलाचा अपघात घडवून आणून तिला कायममचे संपवायचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकारचा अमरावतीतमधील राजकमल चौक येथे निषेध नोंदवण्यात आला.
उन्नाव अत्याचार प्रकरणाविरोधात अमरावतीत निषेध आंदोलन - उन्नाव अत्याचार प्रकरणाविरोधात अमरावतीत निषेध
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, आम्ही सारे फाऊंडेशन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, युवा संवाद प्रतिष्ठान, भारतीय महिला फेडरेशन, राष्ट्र सेवा दल, अमरावती युवा संवाद प्रतिष्ठान यांच्यावतीने राजकमल चौक येथे निषेध नोंदवण्यात आला. 2017 मध्ये उत्तर प्रदेशात उन्नाव येथे तरुणीवर बलात्कार झाला होता.
![उन्नाव अत्याचार प्रकरणाविरोधात अमरावतीत निषेध आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4073151-thumbnail-3x2-am.jpg)
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, आम्ही सारे फाऊंडेशन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, युवा संवाद प्रतिष्ठान, भारतीय महिला फेडरेशन, राष्ट्र सेवा दल, अमरावती युवा संवाद प्रतिष्ठान यांच्यावतीने राजकमल चौक येथे निषेध नोंदवण्यात आला. 2012 मध्ये घडलेल्या निर्भया अत्याचार प्रकारानंतर 2017 मध्ये उत्तर प्रदेशात उन्नाव येथे तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर अपघातात तिला संपवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकारानंतर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. निषेध नोंदवताना प्रा.डॉ. सुजाता झाडे, डॉ. महेंद्र मेटे, प्रसेनजीत तेलंग, सुनील घटाळे, प्रदीप पाटील, हर्षल रेवणे, आकाश देशमुख, हिमांशू झाडे, सुवर्णा बोकडे, प्रीती रेवणे, सागर दुर्योधन, विजया गुडधे, ज्योती कोरडे आदी सहभागी झाले होते.