अमरावती- पाच महिन्यांपासून पोलीस पाटलांचे मानधन रखडल्याने जिल्ह्यातील पोलीस पाटीलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
विविध मागण्यांसाठी पोलीस पाटलांचे धरणे आंदोलन
विविध मागण्यांसाठी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलीस पाटील संघटनेने एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
राज्यातील पोलीस पाटील यांच्या थकीत मानधन यासह विविध रास्त न्याय व हक्काच्या मागण्याची पूर्तता शिवजयंती 19 फेब्रुवारीपर्यंत शासनाने करावी, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री यांना गृहमंत्री यांच्यामाध्यमातून पोलीस पाटील यांना दिले होते. मात्र, त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे थकीत मानधन एकत्रित मिळणे व इतर मागण्याचे निवेदन शासनापर्यंत पोहोचवत आहेत. या मागण्यांचा विचार करून येत्या अर्थ निवेदनाची दखल घेऊन राज्यातील पोलीस पाटलांना न्याय देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा -एशिया पोस्टच्या सर्वेक्षणात खासदार नवनीत राणांनी पटकावला 'हा' क्रमांक