महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत कृषी कायद्याविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन; प्रतिकात्मक अंतयात्रा काढत नोंदवला निषेध - youth congress agitation in amravati

अमरावतीत नव्या कृषी कायद्याविरोधात युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी कायद्याची प्रतिकात्मक अंतयात्रा काढत निषेध नोंदविण्यात आला.

agitation-against-agriculture-law-by-youth-congress-in-amravati
अमरावतीत कृषी कायद्याविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन; प्रतिकात्मक अंतयात्रा काढत नोंदवला निषेध

By

Published : Dec 7, 2020, 7:11 PM IST

अमरावती -केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात युवक काँग्रेसच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी कायद्याची प्रतिकात्मक अंतयात्रा काढण्यात आली. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला.


आमदार सुलभा खोडके यांच्या नेतृत्वात आंदोलन -

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरून शेतकरी विरोधी कायद्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली असता, आमदार सुलभा खोडके यांनी आंदोलनात सहभाग घेऊन या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

पोलिसांनी रोखल्याने उडाला गोंधळ -

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणलेले प्रतिकात्मक प्रेत पोलिसांनी हिसकावून घेतले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता पाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने यावेळी गोंधळ उडाला.

शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन कायम राहणार -

पंजाब, हरियाणा, राजस्थान अशा विविध भागातून दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना दिल्लीबाहेर रोखण्यात आले. हा देशातील शेतकऱ्यांवर अन्याय असून केंद्र सरकार शेतकऱ्यांचे काहीही ऐकून न घेता मनमानी करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचे आंदोलन कायम राहणार आहे, असेही युवक काँग्रेसच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details