अमरावती -जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत, त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाहीये, याकडे जर मुख्यमंत्री लक्ष देत नसतील तर मला येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्याच्या दालनासमोर आंदोलन करून अमरावती जिल्हा व विदर्भाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधवे लागेल, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे.
अमरावती कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. रुग्णांना ऑक्सिजन कमी पडतोय. लसीकरणचे सगळे सेंटर बंद आहेत, त्यामुळे अमरावती जिल्हा संकटामध्ये आहे, अमरावतीत दररोज एक हजारच्या वर रुग्ण वाढत आहेत तर तीस - पस्तीस रुग्ण मरण पावत आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे तर मी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना सुद्धा भेटलो होतो त्यांना मी जिल्ह्यातील परिस्थिती सांगितली होती मात्र यावर काहीच कारवाई झाली नाही, त्यामुळे मलाच आता आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच -