अमरावती - मुख्यमंत्री पदावरून सध्या महाराष्ट्र राज्यात 'महा'भारत सुरू आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव समोर येत आहे. निकाल लागून 15 दिवस झाले असतांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून दोनही पक्षांमध्ये संघर्ष सुरू आहे. तर गेल्या 15 दिवसांत सोशल मीडियावर अनेकांनी रामदास आठवले, अनिल कपूर, सह आदींना मुख्यमंत्री करून टाका, अशा पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यात आता आमदार रवी राणा यांना मुख्यमंत्री करा, आपल्याला आनंदच आहे. मुख्यमंत्री हा विदर्भाचाच झाला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा नको, अशी मागणी करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.
...अखेर 'मुख्यमंत्रि'पदाचा तिढा सुटला; 'या' नेत्याचा नावावर झाला शिक्कामोर्तब, व्हिडीओ व्हायरल
आमदार रवी राणा यांना मुख्यमंत्री करा, आपल्याला आनंदच आहे. मुख्यमंत्री हा विदर्भाचाच झाला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा नको, अशी मागणी करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत शहरातील किरण नगरातील 5 ते 6 लोक रात्री गप्पा मारताना दिसतात.
या व्हिडिओत शहरातील किरण नगरातील 5 ते 6 लोक रात्री गप्पा मारताना दिसतात. तर राज्यात सरकार कधी स्थापन होईल, याकडे संपूर्ण देशाचे आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे लक्ष लागले आहे. गावागावात ओट्यावर बसणारे वृद्ध, तरुण, नागरिक सरकार कुणाचं बसणार यावर चर्चा करताना दिसत आहेत. सेना-भाजपच्या या संघर्षातमुळे राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा अजूनही कायमच आहे. आज (शुक्रवारी) रात्री 15 वाजता विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे आज काय राजकीय घडामोडी, समीकरणे घडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा -..तर सत्तेचा तिढा एका मिनिटात सुटेल - खासदार कृपाल तुमाणे