महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच, जन्मदात्रीनेही सोडले प्राण - सावरखेडा

मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच आईला याचा धक्का सहन झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटनाअमरावतीतील सावरखेडा गावात घडली आहे.

गजानन खोडे आणि त्यांची आई

By

Published : Jun 2, 2019, 12:24 PM IST

अमरावती -मुलाच्या मृत्यूच्या बातमीचा धक्का सहन झाल्याने जन्मदात्या आईने मुलाच्या पाठोपाठ या जगाचा निरोप घेतला. कमलाबाई, असे मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. ही घटना अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील सावरखेड या गावात घडली.

सावरखेड ग्रामपंचायत

सावरखेडा गावचे सरपंच गजानन खोडे (४५) हे गेल्या काही महिन्यांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांना अमरावतीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, शनिवारी त्याची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या अकाली मृत्यूची बातमी त्यांची आई कमलाबाईला कळताच त्यांना धक्का बसला. ज्या मुलाला लहानाचे मोठे होताना पाहले. त्याचाच मृतदेह पाहण्याची वेळ या माऊलींवर आली होती. याच धक्क्यातून तिनेही अखेरचा श्वास घेतला.

आई-मुलाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यामुळे खोडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी मुलगा आणि आईवर एकाच ठिकाणी एकाच वेळेस अंत्यसंस्कार करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details