महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तब्बल आठ दिवसानंतर चिखलदऱ्यात पुन्हा दाटले धुके - अमरावती न्यूज

26-27 जून ला शनिवार आणि रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसली होती. या गर्दीमुळे चिखलदऱ्यातील हॉटेल, लॉज हे हाऊसफुल झाले होते. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा ओढा हा चिखलदाऱ्याकडे असतो. चिखलदऱ्यातील देवी पॉइंट, सायकल सफारी पॉइंट, उंट सफारी पॉइंट, तसेच, घोडा सफरीलाही मोठ्या प्रमाणावर पर्यटक पसंती देत आहेत.

चिखलदऱ्यात पुन्हा दाटले धुके
चिखलदऱ्यात पुन्हा दाटले धुके

By

Published : Jul 9, 2021, 1:08 PM IST

अमरावती - मागील पंधरा दिवसांपासून संपूर्ण विदर्भात पावसाने दडी मारली होती. आता पुन्हा एकदा पाऊस हा विदर्भासह राज्यात सक्रीय झाला आहे. मुसळधार पावसाअभावी विदर्भाचे काश्मीर असलेल्या चिखलदऱ्यात आठ दिवसांपासून धुके दाटले आहे. शनिवारी पहाटेच चिखलदऱ्यात धुके पसरले होते. पर्यटक मनसोक्त या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. छोटे-मोठे धबधबे पर्यटकांसाठी कमालीचा आकर्षणाचा विषय ठरत आहे.

चिखलदऱ्यात पुन्हा दाटले धुके
26-27 जूनला दहा हजारापेक्षा जास्त पर्यटक
26-27 जूनला शनिवार आणि रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसली होती. या गर्दीमुळे चिखलदऱ्यातील हॉटेल, लॉज हे हाऊसफुल झाले होते. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा ओढा हा चिखलदाऱ्याकडे असतो. चिखलदऱ्यातील देवी पॉइंट, सायकल सफारी पॉइंट, उंट सफारी पॉइंट, तसेच, घोडा सफरीलाही मोठ्या प्रमाणावर पर्यटक पसंती देत आहेत. चिखलदऱ्यातील भीम कुंडातील मुख्य धबधबा प्रवाहीत झाल्याने तेथेही पर्यटक गर्दी करतायेत. या दोन दिवशी मोठ्या प्रमाणातपर्यटकांची गर्दी उसळली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details