महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis On Crop Loan : पीक कर्जाकरिता सिबिल मागणाऱ्या बँकांवर दाखल होणार एफआयआर : देवेंद्र फडणवीस - पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अशी सिबिलची मागणी करणाऱ्या बँकांविरोधात एफ. आय. आर दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज अमरावतीत जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

By

Published : May 9, 2023, 9:54 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

अमरावती :शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देण्याचा काही बँकांकडून पीक कर्जासाठी सिबिलची मागणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अशी सिबिलची मागणी करणाऱ्या बँकांविरोधात एफ. आय. आर दाखल करण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आज जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक घेतल्यावर पत्रकारांशी बोलताना बैठकीतील महत्वपूर्ण निर्णयांवर भाष्य केले.

आवश्यकतेपेक्षा 211 टक्के बियाणे उपलब्ध :अवकाळी पाऊस किंवा कुठलेही संकट आले तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काळजी करण्याची गरज नाही. अमरावती जिल्ह्यात आवश्यकतेपेक्षा 211 टक्के बियाणे उपलब्ध असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. सोयाबीनचे 65 टक्के घरगुती बियाणे अमरावती जिल्ह्यात उपलब्ध आहे. केवळ पस्तीस टक्केच सीड रिप्लेसमेंट असून त्याचा शेतकऱ्यांना चांगला लाभ होणार. त्याचे प्रमाणीकरण देखील करण्यात आले आहे. मागील वर्षी खताची जी काही खपत होती त्यापेक्षा अधिक प्रमाणात जिल्ह्यात खत उपलब्ध असल्यामुळे खताची टंचाई देखील यावर्षी शेतकऱ्यांना भासणार नाही. असे देखील उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पीक कर्जाकरिता सिबिलची अट नाही :शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देताना कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना सिबिलची अट घालता कामा नये. याबाबत आरबीआयचे देखील निर्देश असून कोणत्याही बँकेने पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिल विनाकारण त्रास देऊ नये असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. अमरावती जिल्ह्यातील काही बँकांनी अनुदानाचे पैसे हे कर्ज खात्यात टाकले आहे. त्या संदर्भात आम्ही कठोर भूमिका घेतली असून अशा बँकांना शोकास नोटीस बजावण्यात आली आहे. अनुदानाचे कुठलेही पैसे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात टाकू नये असे निर्देश आम्ही दिले आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जलयुक्त शिवाराची कामे वेगाने कारा :यदाकदाचीत दुर्दैवाने जर अल्नीनो मुळे कमी पाऊस झाला तर जलयुक्त शिवारा संदर्भात जी काही कामे आहे ती वेगाने करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. आता अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले आहे त्या नुकसानाची भरपाई तीन टप्प्यात दिली जात आहे. वादळामुळे वीज पुरवठा संदर्भात ज्या काही अडचणी निर्माण झाल्या त्या सुद्धा तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे नियोजन आम्ही केले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादी हा महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही :राष्ट्रवादी काँग्रेसने 2014 आणि 2019 मध्ये जी काही स्वप्न पाहिली ती कधीही पूर्ण होणारी नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रव्यापी पक्षाच नाही अशी टीका पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या शरद पवार यांना आपला पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी जी काही कसरत करावी लागत आहे ते पाहता त्यांनी इतर पक्षांबाबत काही बोलावं की नाही बोलावं याचा विचार त्यांनी स्वतःच केला पाहिजे असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  1. Pradeep Kurulkar ATS Custody : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस कोठडी
  2. Vikhe Patil On New Sand Policy : नवीन वाळू धोरणाबाबत वाळूतस्करांकडून दिशाभूल - महसूल मंत्री
  3. HSC Exam : उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल, बोर्डाने पाठवली नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details