महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूर्णा नदी पात्रातून रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या पाच टिप्परवर कारवाई - पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तहसील अंतर्गत पूर्णा नदीच्या येलकी रेती घाटमधून मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध वाहतूक होत असल्याने सकाळी महसूल व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाच टिप्परला रेतीची चोरी करताना रंगेहात पकडले.

smuggling sand
smuggling sand

By

Published : Mar 19, 2021, 3:16 PM IST

Updated : Mar 19, 2021, 3:25 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तहसील अंतर्गत पूर्णा नदीच्या येलकी रेती घाटमधून मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध वाहतूक होत असल्याने सकाळी महसूल व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाच टिप्परला रेतीची चोरी करताना रंगेहात पकडले. यात पाच टिप्पर जप्त करण्यात आले आहेत.

या ठिकाणी लिलाव झालेल्या रेती घाटा व्यतिरिक्त घाट मालक शरद पाटील यांनी घेतलेल्या घाटांव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून उत्खनन केल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती. अशावेळी अचलपूरचे तहसीलदार व तहसील प्रशासनाने ही कारवाई केली आहे. जिल्हात वर्धा नदीनंतर पूर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर रेती आहे. यात प्रमाणात रेती साठा आहे. त्यामुळे रेती तस्करीचे मोठं जाळं आहे.

पूर्णा नदी पात्रातून वाळूची तस्करी
अमरावती जिल्ह्यातील अनेक रेती घाटाचे लिलाव झाले आहेत. तर काही रेती घाटाचे लिलाव अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे ज्या रेती घाटाचे लिलाव झाले त्यालाच लागून असलेल्या काही घाटाचे लिलाव न झाल्याने काही घाट मालक हे शेजारील घाटात अतिक्रमण करून तेथील वाळूचा अवैध रित्या उपसा करत आहे.असाच प्रकारही पुर्ण नगरच्या पूर्णा नदीत सुरू होता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी याची तक्रार केल्यानंतर आज पहाटेही मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
Last Updated : Mar 19, 2021, 3:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details