महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : अंजनगाव सुर्जी येथे वाईन शॉप व कपडा व्यावसायिकांवर कारवाई - corona restriction disobey Anjangaon Surji

संपूर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसायाला बंदी असतानासुद्धा जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील बाजारपेठेत कापड व्यापारी व इतर व्यावसायिक गिऱ्हाईकांना दुकानाच्या आतमध्ये घेऊन शटर बंद करून व्यवसाय करीत होते.

Tehsildar Abhijeet Jagtap fine cloth shop
कापड व्यावसायिक कारवाई तहसीलदार अभिजीत जगताप

By

Published : May 9, 2021, 6:39 PM IST

अमरावती - संपूर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसायाला बंदी असतानासुद्धा जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील बाजारपेठेत कापड व्यापारी व इतर व्यावसायिक गिऱ्हाईकांना दुकानाच्या आतमध्ये घेऊन शटर बंद करून व्यवसाय करीत होते. याबाबतची माहिती नव्याने रुजू झालेले तहसीलदार अभिजीत जगताप यांना मिळाताच त्यांनी धडक कारवाई करून वाईन शॉप व कापड व्यावसायिकांकडून दंड स्वरुपात एकाच दिवशी 1 लाख 34 हजार 200 रुपये वसूल केले.

धडक कारवाईचे दृश्य

हेही वाचा -ग्रामपंचायत सदस्य बलवीर चव्हाण यांची उच्च न्यायालयात धाव

शटर बंद दुकानात गिऱ्हाईक

लॉकडाऊन असताना शहरातील दोन प्रसिद्ध कपड्यांची मोठी दुकाने नवरंग ड्रेसेस, माहेश्वरी कलेक्शन व कृष्णा साडी सेंटर येथे दुकानात चोरून व्यवसाय सुरू होता. यासह काही लहान दुकांनामध्येही गिऱ्हाईक होते. शटर बंद करून व्यवसाय करणाऱ्या या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

असा दिला आर्थिक दंड

तहसीलदार जगताप यांनी लॉकडाऊन असताना दुकान सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना आर्थिक दंड ठोठावला. यात नवरंग ड्रेसेस व माहेश्र्वरी कलेक्शन यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, कृष्णा साडी सेंटरला १३ हजार रुपये असा दंड ठोठवला. तसेच, शहराच्या मध्यवस्तीतील परकाळे वाईन शॉप हे शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून दारू विक्री करत असल्याचे स्वत: तहसीलदार अभिजीत जगताप यांना आढळून आल्याने परकाळे वाईन शॉपला ४० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला, तर इतर काही व्यावसायिकांना नियमांचे उल्लंघन केल्याने दंड ठोठवण्यात आला. त्यामुळे, आज एकाच दिवशी १ लाख ३४ हजार २०० रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली.

..यांनी केली कारवाई

कारवाई पथकामध्ये तहसीलदार अभिजीत जगताप, पोलीस उपनिरीक्षक सपकाळ, नायब तहसीलदार पोटदुखे, नगर पालिका पथकप्रमुख पुरण धांडे, विठोबा घोंगे, मंडळ अधिकारी मिरगे, अविनाश पोटदुखे, गजानन पिंपळकर, तलाठी गवई, पोलीस कर्मचारी गोपाल सोळंके, न.प. कर्मचारी दादाराव जंवजाळ, फारुक व इतर कर्मचारी होते.

हेही वाचा -अवादा फाऊंडेशनतर्फे अमरावतीत पाच व्हेंटिलेटर, २० कॉन्सन्ट्रेटरची मदत

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details