महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच आरोपीचा हल्ल्याचा प्रयत्न - Swapnil Umap

चौकशी करण्यासाठी घरी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अमरावतीच्या शिरजगाव बंड या गावात घडली आहे.

चांदुर बाजार पोलीस ठाणे

By

Published : Jul 17, 2019, 10:39 PM IST

अमरावती- पत्नीला चाकू मारलेल्या आरोपीची चौकशी करण्यासाठी घरी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अमरावतीच्या शिरजगाव बंड या गावात घडली आहे. विनोद बोबडे असे थोडक्यात बचावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलीस कर्मचाऱ्यावरच आरोपीचा हल्ल्याचा प्रयत्न

शिरजगाव बंड येथील आरोपी जितेंद्र वासनकर याने कालच त्याच्या पत्नीवर चाकूने वार केले. यात ती जखमी झाली आहे. आरोपी जितेंद्र याच्या विरोधात मंगळवारी चांदुर बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेले पोलीस शिपाई विनोद बोबडे यांच्या गाडीची चावी काढून आरोपीने धमकवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपीने स्वतःचे वाहन त्या पोलीस शिपायावर चढविण्याचा प्रयत्न केला.पण, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पोलिसावरच जर भर दिवसा हल्ल्याचा प्रयत्न होत असेल तर मग सामान्य माणसांचे काय, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details