अमरावती: (Amravati) बाप आपल्या मुलांना दारू पाजत (who gives liquor to children) असल्याचा एक व्हिडिओ माध्यमांमध्ये दोन दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणी आता कुऱ्हा पोलिसांनी (Police action against that father) या असंस्कारी बापाचा शोध घेऊन मुलांना दारू पाजणाऱ्या बापावर कारवाई केली आहे. तो आर्वी तालुक्यातील देउरवाड़ा येथील रहिवासी असून त्याचे नाव गजानन कैलुके असे आहे. (Prevention of Child Abuse Act) बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 77 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालकांना व त्यांच्या आईला बालकल्याण समिती अमरावती (Child Welfare Committee Amravati) येथे बोलवण्यात आहे.
मुलांना दारु पाजणाऱ्या बापाचा व्हिडिओ व्हायरल
विविध माध्यमांमधून बातमी प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्या असंस्कारी बापाचा शोध घेतला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार या बापावर कारवाई करण्यात आली आहे. देऊरवाडा अंजनसिंगी मार्गावर असलेल्या एका बारच्या बाजूला भर रस्त्यात या बापाने आपल्या मुलांना दारू पाजली होती. मुलांची प्रकृती चांगली राहत नसल्याने, यापूर्वी सुद्धा अनेकदा आपण मुलांना दारू पाजली असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. या सर्व प्रकरणात बालकल्याण समिती काय कारवाई करणार याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण? :आपल्या जन्मदात्या बापानेच आपल्या मुलांना दारू पाजण्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यात घडला होता. तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर या गावात देउरवाड़ा ते अंजनसिंगी मार्गावरचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आला होता. आपल्या तीन मुलांना सोबत घेऊन दारू पाजत असतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. असंस्कारी या बापाच्या कृत्यामुळे समाजातून संताप व्यक्त केल्या गेला.
व्हिडीओ व्हायरल -तसं म्हटलं तर बापाने लपून छपून दारु पिण्याचे दिवसही केव्हाचेच मागे सरलेत. पण दिवस इतकेही पुढारलेपणाचे आलेले नाहीत, की बाप चक्क आपल्या चिमुरड्या पोरांसोबत दारु ढोसेल. इतकंच काय तर त्यांनाही दारु पाजेल! हे काही पुढारलेपणाचं लक्षण नक्कीच नाही. पण असा विचित्र प्रकार समोर आला आहे. ही घटना अमरावतीची असल्याचं सांगितले जात आहे्. एक बाप आपल्याच चिमुरड्या पोरांना दारु पाजतोय. एकूण पाच लोकं मिळून दारुची पार्टी करतायत. यात एक अल्पवयीन मुलगाही दिसतोय. एक लहान मुलगी, एक अगदीच चिमुरडा आहे. या सगळ्यांसोबत चिमुरड्यांचा बापही समोर बसलाय. तर, पाचवा व्यक्ती व्हिडीओ काढतोय. दारु पार्टीचा हा झिंगाट व्हिडीओ काढताना सगळ्यांनाच मजा येत होती.
हेही वाचा :VIRAL VIDEO : पन्हाळगडावर पुरुषांसह महिलाही ढोसतायत दारु; कारवाई होणार का ?