महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या निर्माणधीन पुलावरून ३ कामगार पडले - अमरावतीत अपघात

निंभोरा बोडखा गावानजीक नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती सुपर एक्स्प्रेस महामार्गाच्या निर्माणधीन पुलावरून पुलाच्या लोखंडी गजाचे काम करताना अचानकपणे मचाग पडल्याने ३ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.

नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती मार्गावर अपघात
dhamangaon

By

Published : Nov 26, 2019, 8:48 PM IST

अमरावती- धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखा गावानजीक नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती सुपर एक्स्प्रेस महामार्गाच्या निर्माणधीन पुलावरून पुलाच्या लोखंडी गजाचे काम करताना अचानकपणे मचाण पडल्याने ३ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.

नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गावर अपघात


मिळालेल्या माहितीनुसार असे की, तालुक्यातील निंभोरा बोडखा गावानजीक नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती सुपर एक्स्प्रेस महामार्गाच्या निर्माणधीन पुलावर मजनू मिया (२५), ओखील वरमन (३४) व विधान वरमन (१८) रा.कलकत्ता (पश्चिम बंगाल) यांच्यासह आदी कामगार लोखंडी गज बांधणीचे काम करीत होते. परंतु, अचानकपणे मचाण पडल्याने हे तिघेजण खाली पडले. यामध्ये या ३ कामगारांना लोखंडी गजाचा जबर मार लागला. या जखमींना प्रथम ह्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारार्थ यवतमाळ येथील रुग्णालयात हलविणात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details