अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहावर आज सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान कार आणि शेतमाल घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरमध्ये अपघात झाला. शेतमाल घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला कारने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
अमरावती नागपूर महामार्गावर कार-ट्रॅक्टरचा अपघात, जीवितहानी नाही. - road accident during lockdown
नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहावर आज सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान कार आणि शेतमाल घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. शेतमाल घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला कारने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. दरम्यान सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
अमरावती नागपूर महामार्गावर अपघात
कारमधील एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूरकडून औरंगाबादला निघालेली कार अमरावती शहराजवळ असलेल्या राणा लॅण्डमार्क परिसरात ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होती. याचवेळी ट्रॅक्टरच्या दोन चाकांच्यामध्ये कार घुसल्याने ट्रॉली रस्त्यावर पलटी झाली. कारने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.