अमरावती -रस्ता ओलांडत असताना एक अनोळखी इसम ट्रकच्या धडकेत जागीच ठार ( Amravati Truck Accident ) झाला. ही घटना धुळे - कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग ( Dhule-Calcutta National Highway ) क्रमांक ६ वर आज सकाळी ११:४५ वाजता घडली. शहराच्या बाहेररून जाणाऱ्या या महामार्गावर वाहनांची कायम वर्दळ ( Constant traffic of vehicles ) असते. छत्री तलाव जवळून जाणाऱ्या या महामार्गावरून हा इसम रस्ता ओलांडत असतांना अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत इसम जागीच ठार झाला.
Amravati Truck Accident : अमरावतीत ट्रकच्या धडकेत इसम जागीच ठार, धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील घटना - Constant traffic of vehicles
अमरावकतीत ट्रकच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला आहे. धुळे-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग ( Dhule-Calcutta National Highway ) क्रमांक ६ वर आज सकाळी ११:४५ वाजता हा अपघात झाला. छत्री तलावाजवळून जाणाऱ्या या महामार्गावरून हा इसम रस्ता ओलांडत असताना अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.
महामार्गावर वाहनांची कायम वर्दळ -शहराच्या बाहेरून जाणाऱ्या या महामार्गावर वाहनांची कायम वर्दळ असते. छत्री तलावाजवळून जाणाऱ्या या महामार्गावरून हा इसम रस्ता ओलांडत असतांना अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत इसम जागीच ठार झाला. सदर इसमाचा मोबाईल आणि इतर साहित्य घटनास्थळी पडून होते. नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरावती येथे एका बैठकीसाठी अमरावतीला येत असतांना त्यांनी आपले चार चाकी वाहन बाजूला घेऊन घटनेची माहिती राजपेठ पोलीस स्टेशनला दिली.