अमरावती -मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गुगामल वन्यजीव विभागातील अकोट ते धारणी मार्गावर खासगी बस दरीत पडता पडता वाचली आणि दोन चाकावर उभी झाली. या बसमधील 20 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. अकोट ते धारणी हा नागमोडी घटवळाचा रस्ता असून या रस्त्याची गुणवत्तेअभावी चाळणी झाली आहे.
मेळघाटात दीडशे फूट खोल दरीत बस कोसळताना थोडक्यात बचावली
मेळघाटात दिडशे फूट खोल दरीत बस कोसळताना थोडक्यात बचावल्यामुळे अपघात झाला नाही. अकोट ते धारणी रस्त्यावर ही घटना घडली.
80 किलोमीटरचा हा घाट अतिशय धोकादायक वळणांचा मार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकार्यांकडून कायद्याचा बडगा दाखवला जात असला तरी जंगलात रस्ते विकासावर बांधकाम विभागाने कोट्यावधीचा निधी खर्च केला तरीही या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. म्हणून मेळघाटातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते जीवघेणे ठरलेले आहे. आदिवासी भागात रोजगाराची कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने स्थलांतरित कुंटुंबे ढाकणा, अकोट मार्गाचा वापर करत आहे. अजमेर ते काचीगुडा या रेल्वेमार्गाचे भिजत घोंगडे असल्याने या भागातील हजारो मजुरांची धारणी, अकोट मार्गावर संपूर्ण भिस्त आहे. या मार्गाची दुरूस्ती करून मार्ग मोकळा करायला पाहिजे होता. मात्र, दुरूस्ती न झाल्याने या मार्गाने नेहमीच अपघात होत आहेत. शुक्रवारी खाजगी बस अकोटवरून धारणीकडे चार वाजता येत होती. ढाकणा अकोट मार्गावर ही बस दीडशे फुट दरीत चालकाच्या सतर्कतेने पडता पडता वाचली अन् 20 प्रवाशांचे प्राण वाचले.