महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amravati Accident News : दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक, दोघे जागीच ठार - Two Wheeler And Four Wheeler

अमरावतीमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. अंजनगाव सुर्जी-दर्यापूर मार्गावर विहिगाव ते मुऱ्हा देवी या गावांच्यामध्ये चारचाकी व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोघे जागीच ठार झाले आहेत.

Amravati Accident News
वाहनाची समोरासमोर धडक

By

Published : Jun 29, 2023, 9:45 PM IST

अमरावती : बुधवारी रात्री शारिक याकूब वय (27) व त्याचा मित्र शोयब खान, अखिल खान वय (23) हे दोघे दर्यापूरवरून दुचाकीने अंजनगावला जात होते. मुऱ्हा देवी फाट्याच्या व विहिगाव फाट्याच्यामध्ये अंजनगावकडून येणाऱ्या स्कार्पिओ गाडीने भरधाव असलेल्या मोटरसायकलला धडक दिली. त्यामध्ये मोहम्मद याकूब व त्याचा मित्र शोयबखान अखिल खान ( 23) राहणार दर्यापूर हे दोघेजण जागीच ठार झाले.



घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका :या घटनेबाबत फिर्यादी शेख अफसर यांनी रहिमापूर पोलीस ठाण्यात महिती दिली. यावेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सचिद्र शिंदे तसेच अंजनगावचे ठाणेदार दीपक वानखडे व ठाणेदार निलेश देशमुख घटनास्थळी पोहोचले. अपघातातील ठार झालेल्या दोघांचेही मृतदेह रुग्णवाहिकेतून दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय येथे पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले. या घटनेचा तपास ठाणेदार निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पीएसआय ढोकेकर, एस.आय लुटे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे हे करीत आहे. तर स्कॉर्पिओ चालकास अटक करण्यात आली आहे.

टाटा पिकअप व ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात: याआधीही असाच एक अपघात घडला होता. अमरावती येथे राष्ट्रीय महामार्ग 6 वरील अमरावती शहरानजीक असलेल्या रहाटगाव टी पॉइंटवर टाटा पीकअप व ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात पीकअप वाहनाच्या क्लिनरला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच पीकअप वाहनातील १० गोवंशाचादेखील यात मृत्यू झाला होता. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले होते. संगम मोहोड आणि सलीम खान अकबर खान असे वाहनचालकांचे नाव होते.

हेही वाचा -

  1. MP Accident Death : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला, मध्य प्रदेशात मिनी ट्रक नदीत उलटून 12 नागरिकांचा मृत्यू
  2. Rewa Road Accident : मध्य प्रदेशात अनियंत्रित कार 20 फूट दरीत कोसळली, 4 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी
  3. Rath Yatra 2023: त्रिपुरात रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; रथाचा हाय व्होल्टेज तारेला स्पर्श, 7 जणांचा शॉक लागून मृत्यू, अनेकजण जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details