अमरावती- जिल्ह्यातील तळेगाव दशासर जिल्हा परिषद सर्कलच्या महिला जिल्हा परिषद सदस्या व त्यांचे पती या दाम्पत्याला १० हजार रुपयांची लाच घेताना आज दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील महिला जिल्हा परिषद सदस्या या काँग्रेस पक्षाच्या असून या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद सदस्यासह तिच्या पतीला १० हजार रुपयाची लाच घेताना अटक - लाच
महिला जिल्हा परिषद सदस्या व त्यांचे पती या दाम्पत्याला १० हजार रुपयांची लाच घेताना आज दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
![जिल्हा परिषद सदस्यासह तिच्या पतीला १० हजार रुपयाची लाच घेताना अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3095969-739-3095969-1556109804395.jpg)
अनिता राजु मेश्राम (वय ४५) त्यांचे पती राजू एकनाथ मेश्राम (वय ५०) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तक्रारदार यांचा लाकूड तोडून विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्याने तळेगाव दशासर येथील तलावावरील बाभळीच्या झाडे तोडली. याची तक्रार न करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता मेश्राम यांनी १५ हजार रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली. तेव्हा तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे तक्रारदाराने मान्य केले.
याबाबत तक्रारदाराने अमरावतीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तेव्हा एसीबीने सापळा रचून १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना दाम्पत्याला पकडले.