अमरावती - जिल्ह्यातील तिवसा पंचायत समिती कार्यालयावर आशा स्वयंसेविका युनियन आणि सिटू या संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी सहभाग नोंदवला. दरम्यान, यावेळी या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार निदर्शन केले.
अमरावतीच्या तिवसा पंचायत समितीवर आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे आंदोलन
पगारवाढ, शासकीय कर्मचारी दर्जा मिळावा इत्यादी मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी तिवसा पंचायत समिती कार्यालयावर आंदोलन केल्याची माहिती आहे.
यावेळी, यवतमाळ येथील आशा स्वयंसेविकांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच पोलिसांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच मुख्यमत्र्यांनी दिलेल्या तीन पट मानधन वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची तातडीने अंमलबजावणी करा, सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तीकांचा शासकीय कर्मचारी दर्जा मिळावा, इत्यादी मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, प्रतिनिधी मंडळाने गट विकास अधिकारी गावडे यांना निवेदन सादर केले. या आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे नेते महादेव गरपावर आणि शेतमजुर युनियनचे जिल्हा सचीव दिलीप शापामोहन यांनी केले.
हेही वाचा - ऐन गणेशोत्सवातच राज्यातील शेतकरी, कामगार, शिक्षक रस्त्यावर.. फडणवीस सरकारची कसोटी