महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत सर्वोत्कृष्ट 'आशा पुरस्कार' वितरण सोहळ्यात राष्ट्रभक्तीचा संदेश

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदच्या संयुक्तने सर्वोत्कृष्ट आशा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

By

Published : Aug 24, 2019, 11:41 AM IST

अमरावती

अमरावती- ग्रामीण तसेच आदिवासी भागातील जनतेत आरोग्य जनजागृती करण्यासाठी गरोदर माता व बालकांच्या सुदृढ आरोग्य सेवेसाठी 2018-19 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रभक्तीचा संदेश देणारे नृत्य, नाट्यही सादर करण्यात आले.

अमरावतीत सर्वोत्कृष्ट 'आशा पुरस्कार' वितरण सोहळ्यात राष्ट्रभक्तीचा संदेश

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदच्या संयुक्तने सर्वोत्कृष्ट आशा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जिल्ह्यात प्रथम पुरस्कार चांदूरबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या जगन्नाथपूर या गावतील साधना रावसाहेब धकडे यांनी पटकावला. त्यांचा रोख आठ हजार रुपये, प्रशस्तीपत्र,स्मृतिचिन्ह, नारळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. द्वितीय पुरस्कार मेळघाटातील दुर्गम आशा बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या किन्हीखेडा गावातील स्लीता बन्सीलक धिकार यांनी पटकावला. जिल्ह्यातील सुमारे दोनशेच्या अशांचा या सोहळ्यात विविध कार्यांसाठी गौरव करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहकतानंतर आशा कार्यकर्त्यांनी राष्ट्भक्तीपर गीत, नृत्य आणि नाटक सादर केले. सोहळ्याला खासदार नवनीत राणा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.दिलीप निकासे, डॉ. रेवती साबळे, डॉ. संजय पंदराम, डॉ. दिलीप चारहाटे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन प्रफुल रिधोरे, जिल्हा पेशिक्षण पथकाचे रवींद्र किटूकले आदींनी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी योगदान दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details