अमरावती -सहा ते सात महिन्यांपासून पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचा दुसऱ्या टप्प्यातील निधी अद्यापही मिळालेला नसून यामुळे त्रस्त लाभार्थ्यांना घेऊन आम आदमी पक्षाने चांदूर रेल्वे नगर परिषदेवर गुरुवारी (दि. 17 डिसें.) धडक मोर्चा काढण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत धनादेशाचा प्रश्न मार्गी न लागल्यास नगर परिषद कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, इशारा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन देण्यात आला.
200 कुटूंबाचे घरकुल मंजूर
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चांदूर रेल्वे नगरपरिषद हद्दीत सुमारे दोनशे घरकुले मंजूर झाले आहेत. त्यापैकी काहींना सहा ते सात महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यातील धनादेश मिळाला होता. त्यानंतर बऱ्याच लाभार्थ्यांनी आपले बांधकाम सुरू केले. त्याची प्रशासकीय माहिती ही वेळेवर नगरपरिषदेला दिली.