महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरकुलाचा निधी मंजूर झाल्यावरही मिळाला नाही, आम आदमी पक्ष आक्रमक - चांदूर रेल्वे शहर न्यूज

अनेक महिन्यांपासून पंतप्रधान आवास योजनेचा घरकुलाचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी नगर परिषदेला आला असतानाही प्रशासनाच्या कासवगतीच्या कारभारामुळे निधी तसाच पडून आहे. अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झाला नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाने आज (शनिवार) नगर परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकांना घेराव घातला.

Amravati
आम आदमी पार्टी आक्रमक

By

Published : Mar 14, 2020, 5:00 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात अनेक महिन्यांपासून पंतप्रधान आवास योजनेचा घरकुलाचा निधी मंजुर झाला आहे. हा निधी नगर परिषदेला आला असतानाही प्रशासनाच्या कासवगतीच्या कारभारामुळे निधी तसाच पडून आहे. अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झाला नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाने आज (शनिवार) नगर परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकांना घेराव घातला. अखेर १७ मार्चपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.

घरकुलाचा निधी मंजूर होऊनही न मिळाल्याने आम आदमी पक्ष आक्रमक

आम आदमी पक्षाचा मोर्चा नगर परिषदमध्ये पोहोचताच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप लागले होते. मात्र, त्यांच्या गैरहजेरीत हे दालन उघडे राहते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी आम आदमी पक्षाच्या आंदोलनाचा धसका घेऊन त्यांचे कार्यालय बंद ठेवायला लावल्याची चर्चा होती. या आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पक्षाचे विदर्भ नेते नितीन गवळी यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details