अमरावती- मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील 'टी-२३' हा वाघ खूप दिवसापूर्वी मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरच्या वन परिक्षेत्रात जळालेल्या अवस्थेत मृत आढळला होता. वाघाच्या या संशयास्पद मृत्यूने मध्यप्रदेश वन विभागाने केलेल्या चौकशीअंती एका वनरक्षकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मृत वाघाचे अवयवही जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मेळघाट प्रशासनाने देखील दोन आरोपींना अटक केली आहे.
धक्कादायक..मेळघाटातील वाघाचा संशयास्पद मृत्यू; दोघांना अटक, वनरक्षकाचाही समावेश - forest guard arrested
मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील 'टी-२३' हा वाघ मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरच्या वन परिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला होता. वाघाच्या या संशयास्पद मृत्यूने मध्यप्रदेश वन विभागाने केलेल्या चौकशीअंती एका वनरक्षकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मेळघाट प्रशासनाने देखील दोन आरोपींना अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार वनपरिक्षेत्रात १३ एप्रिलला वाघाचा मृतदेह आढळून आला होता. मेळघाटमधील आंबाबरवा वन्यजीव अभयरण्यात अधिवास करणारा 'टी-२३' नामक वाघाचा तो मृतदेह होता. आंबाबरवा वनपरिक्षेत्राला लागूनच असलेल्या मध्यप्रदेशातील खकनार परिक्षेत्रात त्याचे कुजलेले शरीर आढळून आले होते. मध्यप्रदेश वन विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी जागेवर पोहोचण्यापूर्वीच वाघाचे शरीर अज्ञातांकडून जाळण्यात आले होते. वाघाला जाळण्यापूर्वी त्याचे अवयव काढण्यात आले होते. या प्रकरणी मध्यप्रदेशातील वनधिकाऱ्यांनी तेथील वनरक्षक माहिती घेत आहे. दरम्यान वाघाचे अवयव जप्त करण्यात आले असून वाघाचे शरीर जाळणाऱ्या अज्ञाताचा देखील शोध घेण्यात येत आहे.दुसऱ्या बाजूला मेळघाट प्रशासनाने देखील दोन आरोपींंना अटक केली आहे. याबाबत अधिक तपास वनविभाग करताहेत.