अमरावती - मेळघाटात कुजलेला मानवी सांगाडा सापडला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
काल (30 मे) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे वनरक्षक गणेश मुरकूट त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह सीमाडोह वनखंड १०० व १०३ परिसराच्या सीमेवर नाल्याची पाणी तपासणी करीत होते. यावेळी त्यांना कुजलेला मानवी सांगाडा आढळून आला. यामुळे खळबळ उडाली.
जागेवरच अंत्यसंस्कार
नेमका हा मानवी सांगाडा कुणाचा आहे? याची ओळख न पटल्याने अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिखलदरा पोलिसांना माहिती दिली. चिखलदरा पोलीस व डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र परिसरात काहीच मिळाले नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी पंचनामा करून डॉक्टरांच्या हस्ते शवविच्छेदन करून जागेवरच त्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मानवी सांगाडा नक्की कोणाचा आहे? याची ओळख पटविण्यासाठी डॉक्टरांनी काही नमुने घेतले आहेत. ते उत्तरीय तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
हेही वाचा -भाच्यानेच मामाचा तलवारीने चिरला गळा; एकास अटक, दुसरा फरार