महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Replica of Rashtrapati Bhavan :अवघ्या सहा महिण्यात साकारली हुबेहुब राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती - संसदेची प्रतिकृती

जिल्ह्यातील एका अमर नावाच्या कलाकाराने ३०४ खोलींच्या राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती ( 304 room replica of Rashtrapati Bhavan ) साकारली आहे. त्याने ही प्रतिकृती अवघ्या सहा महिण्याच्या कालाधीत साकारली आहे.

राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती
राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती

By

Published : Jan 12, 2022, 12:53 PM IST

अमरावती :परिस्थिती कशीही असली तरी खचून जायचं नाही.आज न उद्या यश येईलच कारण त्याच्या हाताला देवानं कला दिली आहे. त्या कलेचं सोन त्याला करायचं आहे. शिक्षनात तो फार रमला नाही. पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यानं प्रात्यक्षिकांवर भर दिला. सहा महिने अफाट मेहनत घेतली. पैसे नव्हते तर दुसऱ्याच्यांकडे कामाला गेला साहित्य खरेदी केलं आणि आता त्याने राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती साकारली (Replica of Rashtrapati Bhavan ) आहे. अमर मेश्राम ( Amar Meshram Replica of Rashtrapati Bhavan ) अस या शेतकरी पुत्राच नावं आहे. तो अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली या एका छोटया गावात राहतो. त्याने दिल्ली मधील राष्ट्रपती भवनाची जशीच्या तशी प्रतिकृती अमरने त्याच्या अदभुत कलेतून साकारली आहे.

राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती साकारताना अमर मेश्राम
साधारणता वाचन ,गायन, खेळ संगीत आदी क्षेत्रात छंद जोपासणाऱ्या व्यक्ती आपण अनेकदा पाहतो.परंतु अनेक जण वेगवेगळ्या कलाकृती करण्याचा छंद देखील जोपासत असतात. अशापैकीच एक अमर मेश्राम हा तरुण आहे. अमरने पदवी पर्यतचे शिक्षण घेतले आहे. पण त्याला शिक्षणापेक्षा वेगवेगळ्या प्रतिकृती बनवण्यात रस आहे. सातव्या वर्गात शिकत असतानाच त्याने हा छंद जोपासायला सुरवात केली. अगोदर त्याने शहरात असलेल्या उंच इमारतीच्या प्रतिकृती तयार केल्या. त्यांनतर त्याने संसद भवन आणि आता राष्ट्रपती भवनची प्रतिकृती तयार केली आहे. त्याने ३०४ खोलीच्या राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती (304 room replica of Rashtrapati Bhavan ) तयार केली आहे. या राष्ट्रपती भवनात असणाऱ्या सर्वं बारीक सारीक गोष्टी त्याने त्याच्या कलेतून जशाच्या तशाच उतरवल्या आहेत. विशेष म्हणजे चारही बाजूने त्यानं हे राष्ट्रपती भवन बनवलं आहे. यासाठी त्यानं शिट, टूटपिक्स व फ्लायवुड या तीन साहित्याचा वापर केला. त्याला ही प्रतिकृती साकारण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे.
राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती
राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दखल घ्यावी -

अमर मेश्राम याने यापूर्वी संसदेची प्रतिकृती (Replica of Parliament) तयार केली होती. तसेच आता राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती तयार केली आहे. मोठ्या मेहनतीने त्याने ही प्रतीकृती तयार केली आहे. या कलाकृतीचं सगळीकडे कौतुक होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने देखील आपल्या या कार्याची दखल घ्यावी अशी त्याची इच्छा आहे. तसेच आपल्याला काम करण्यासाठी मदत करावी. माझी दखल घेतल्यास मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया अमर यांने व्यक्त केली.

संसदेची प्रतिकृती
प्रतिकृती तयार करण्यासाठी अशी मिळाली अमरला प्रेरणा -

काही महिन्यांपूर्वी काही तरुणांनी महात्मा गांधी यांच्या चरख्याची हुबेहुब प्रतिकृती तयार केली होती. ही बातमी अमरने बघितली होती. त्या तरुणांच्या कामातूनच अमरने ही प्रेरणा घेतली आहे. त्यातूनच त्याने अगोदर संसद भवन आणि आता राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती विद्यार्थ्यांना पाहायला मिळावी, म्हणून तो आता लवकरच लोकांमध्ये ती प्रतिकृती आणणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details