महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला; आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न - शेंदुर्जना बाजार

पुतणीने आपल्या 40 वर्षीय काकाच्या सततच्या त्रासा विरोधात तक्रार दाखल केली होती. याचअनुषंगाने पोलीस आरोपीच्या घरी गेले असता आरोपीने गावंडे यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांना जखमी केले. तर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे.

तिवसा पोलीस स्टेशन
तिवसा पोलीस स्टेशन

By

Published : Sep 26, 2021, 11:00 AM IST

अमरावती -अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदुर्जना बाजार येथील पुतणीने आपल्या 40 वर्षीय काकाच्या सततच्या त्रासा विरोधात तक्रार दाखल केली होती. याचअनुषंगाने पोलीस आरोपीच्या घरी गेले असता आरोपीने गावंडे यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांना जखमी केले. तर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे.

आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला

प्रशांत श्रीरंग देवळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार येथील फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून सतत शिवीगाळ, कुठल्याही कारणावरून भांडण करत होते. तेव्हा सदर महिलेने देवळे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार बीट जमादार विनायक गावंडे हे देवळे यांच्या घरी गेले असता देवळे यांनी चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात गावंडे यांच्या उजव्या हाताला चाकू लागल्याने ते जखमी झाले. तर आरोपी देवळे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी आरोपी प्रशांत श्रीरंग देवळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला आज तिवसा न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली असून सदर प्रकरणाचा तपास तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके या करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details