अमरावती :गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गाडगे नगर परिसरात तीन विद्यार्थिनी एका घरात भाड्याने राहतात. यापैकी एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीचे सोमवारी रात्री पोट दुखायला लागल्यामुळे तिला मंगळवारी पहाटे येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासणी दरम्यान डॉक्टरांना ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी याबाबत गाडगे नगर पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, मंगळवारी सकाळी तिला प्रसववेदना होऊ लागल्याने तिने एका मुलीला जन्म दिला आहे.
आई-वडिलांना बसला धक्का :दरम्यान हा संपूर्ण प्रकाराबाबत अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मैत्रिणींनी तिच्या आई-वडिलांना माहिती दिल्यावर त्यांना जबर धक्का बसला. आई वडील वरूड येथे राहत असून हा प्रकार ऐकल्यावर ते अमरावतीत यायला तयारच नव्हते. मात्र, घाडगे नगर पोलिसांनी त्यांची विनवणी केल्यावर ते अमरावतीला डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालयात पोहोचले.