अमरावती- जगभरात महिलेचा सन्मान व्हावा या उद्देशाने शहरालगतच्या बडनेरा येथील रामू कातोरे हे गृहस्थ मागील २९ वर्षांपासून दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाऐवजी गृह लक्ष्मी पूजन करतात. रविवारी झालेल्या लक्ष्मी पूजनाच्यादिवशी देखील त्यांनी असेच केले. त्यांनी लक्ष्मी पूजन न करता आपल्या पत्नीचे पूजन केले.
अमरावतीत लक्ष्मी पूजनाऐवजी गृहलक्ष्मी पूजन - Laxmi Pujan Wife Pujan News Badenera Amravati
जगभरात महिलेचा सन्मान व्हावा या उद्देशाने शहरा लगतच्या बडनेरा येथील रामू कातोरे हे गृहस्थ मागील २९ वर्षांपासून दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाऐवजी गृह लक्ष्मी पूजन करतात. रविवारी झालेल्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देखील त्यांनी असेच केले. त्यांनी लक्ष्मी पूजन न करता आपल्या पत्नीचे पूजन केले. असे करून त्यांनी महिला सम्मान आणि सक्षमीकरणाचा संदेश दिला आहे.

अमरावतीत लक्ष्मी पुजना ऐवजी गृहलक्ष्मी पूजन
लक्ष्मीपुजनाऐवजी पत्नी पुजन करताना बडणेऱ्याचे रामू कातोरे
एकीकडे समाजात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हुंडाबळी, कौटुंबीक हिंसाचाराच्या घटना दररोज समोर येत आहेत. समाजामध्ये महिलांना हीन दर्जाची वागणूक मिळत असते. अशा प्रकाराला आळा बसावा व महिलांचा सन्मान वाढावा यासाठी दिवाळीला रामू कातोरे हे आपल्या पत्नीची पूजा करतात. दिवाळीत लक्ष्मी पूजनाएवजी पत्नीची पूजा करून रामू कोतरे यांनी समाजासाठी एक आदर्श निर्माण केले आहे.
हेही वाचा-दिवाळी विशेष : अमरावतीत कल्पक किल्ल्यांच्या निर्मितीसाठी चिमुकले रंगले मातीत
Last Updated : Oct 28, 2019, 9:32 PM IST