अमरावती -जोरदार पाऊस कोसळत असल्याने शहानूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रविवारी दर्यापूर येथील रहिवासी आदित्य काळबागे मित्रांसोबत धरणावर मासे पकडण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन धरणात बुडाला. दोन दिवसानंतर आता त्याचा मृतदेह सापडला आहे.
शहानूर धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला - pothrat police
जोरदार पाऊस कोसळत असल्याने शहानूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रविवारी दर्यापूर येथील रहिवासी आदित्य काळबागे मित्रांसोबत धरणावर मासे पकडण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन धरणात बुडाला. दोन दिवसानंतर आता त्याचा मृतदेह सापडला आहे.
आदित्य शहानूर धरणात मासे पकडण्यासाठी उतरला असता त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच पथ्रोत पोलीस घटनास्थळी पोहचले. तसेच अमरावती येथून व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या सुचनेवरून बचाव पथक घटनास्थळी पोहचले. सोमवारी रात्री ८:३० वाजेपर्यंत शोध घेऊनही बचाव पथकाला मृतदेह सापडला नाही.
आज (मंगळवार) सकाळी बचाव पथकाने मृतदेह शोधण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले असता दुपारी आदित्यचा मृतदेह सापडला. धरण परिसरात सुरक्षाकडे लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आदीत्यचा मृतदेह धोरणातून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकातील विजय धुर्वे, किशोर धुर्वे, गौरव जगताप, प्रफुल भुसारी, ओम सावंत, गोकुल मुंडे, प्रेमानंद सोनकांबळे, शरद भांडर्गे, सूर्यकांत मोहने आणि शेख वहिदा यांनी शर्थीचे प्रयत्न केले.