महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, जमावाने ट्रक पेटवल्याने पोलिसांचा लाठीचार्ज - अमरावती अपघात

मनोज मुलचंद नायकवाड (४८) यांनी या अपघातात प्राण गमावले. दुपारी ३ वाजता नागपूरहून बडनेराच्या दिशेने रेती वाहून नेणाऱ्या सोळा चाकी ट्रकने त्यांना धडक दिली होती.

truck
ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, जमावाने ट्रक पेटवल्याने पोलिसांचा लाठीचार्ज

By

Published : Feb 11, 2020, 5:19 PM IST

अमरावती - शहरात जुन्या महामार्गावर ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाच्या गाडीवर जमावाने दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या दुर्घटनेमुळे चपराशीपुरा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, जमावाने ट्रक पेटवल्याने पोलिसांचा लाठीचार्ज

हेही वाचा - चिकन खाणे सुरक्षित, कोरोनाचा संसर्ग होत नाही- केंद्र सरकार

मनोज मुलचंद नायकवाड (४८) यांनी या अपघातात प्राण गमावले. दुपारी ३ वाजता नागपूरहून बडनेराच्या दिशेने रेती वाहून नेणाऱ्या सोळा चाकी ट्रकने मनोज यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नायकवाड हे वडाळीच्या परवारपुरा येथील रहिवासी होते.

हेही वाचा - दिल्ली निवडणुकीमुळे मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात शुकशुकाट, भाजप नेते फिरकलेच नाहीत

या घटनेनंतर नायकवाड यांच्या नातेवाईकांनी बराच वेळ गोंधळ केला. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details