महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुत्र्याने चावा घेतला म्हणून त्याने आणली चायना मेंढी... - अमरावती युवा स्वाभीमान पक्ष

अमरावतीच्या वसीम सिंघानिया या तरुणाने आवड म्हणून कुत्रा किंवा मांजराऐवजी मेंढी पाळायला सुरुवात केली आहे.

a-man-bought-ship-from-china
वसीम सिंघानिया आणि त्याची चायना मेंढी

By

Published : Feb 9, 2020, 4:25 PM IST

अमरावती -आतापर्यंत आपण घरात मांजर व कुत्रा पाळल्याचे बघितले आहे. लोक सर्वाधिक पसंत करतात ते कुत्रा व मांजराला मात्र, अमरावती मधल्या एका व्यक्तीने चक्क कुत्र्याने चावा घेतला म्हणून त्याऐवजी आता मेंढी पाळायला सुरुवात केली आहे. ही चायनीज प्रकारची मेंढी असून, त्यांनी त्याने ऑनलाईन पद्धतीने खरेदी केली. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये ही मेंढी पाहायला मिळाली.

कुत्र्याने चावा घेतला म्हणून त्याने आणली चायना मेंढी...

हेही वाचा -गजाची झलक, सबसे अलग..! तब्बल टनभर वजनाचा बैल ठरतोय अमरावतीतील प्रदर्शनाचे आकर्षण

अमरावतीच्या वसीम सिंघानिया या तरुणाचे फर्निचरचे दुकान आहे. दुकान चालवण्यासोबतच त्याला प्राण्यांची आवड असल्याने एक कुत्रा पाळला होता. मात्र, कुत्र्याने चाव घेतल्यानंतर त्याने मुंबईचं मार्केट गाठलं अन् थेट मूळ चीन जातीची असलेली दीड फूट उंचीची पांढरीशुभ्र व आकर्षक मेंढी खरेदी केली. मेंढीला आता विदर्भातील हवामान सूट झाल्याने तिला आतापर्यंत कोणताही आजार झालेला नाही.

हेही वाचा -अमरावती शहरातील उच्चशिक्षित तरुणीची सापांशी मैत्री

ABOUT THE AUTHOR

...view details