महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती: तिवस्यात महिलांनी भरवला सरकारविरोधी बैलपोळा - तिवस्यात महिलांकडून सरकारचा निषेध

तिवसा येथे महिलांनी भर पावसात आगळावेगळा पोळा साजरा करत बैलजोड्या आणून बैलांच्या शिंगावर व बैलांच्या अंगावर सरकार विरोधी मजकूर लिहीला होता. या पोळ्याद्वारे महिलांनी सरकारविरोधी घोषवाक्ये लिहीत सरकारचा निषेध केला.

महिलांचा बैलपोळा

By

Published : Sep 4, 2019, 6:17 PM IST

अमरावती- जिल्ह्यातील तिवसा येथे पोलीस ठाण्यासमोर आज(बुधवारी) दुपारी महिलांनी आपल्या बैलजोड्यांसह आगळावेगळा बैलपोळा साजरा केला. अशा प्रकारचा महिलांचा पोळा काँग्रेस प्रदेशाध्यक्षा व तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी भरवला. यात महिलांनी आपल्या बैलजोड्या आणून बैलांच्या शिंगावर व बैलांच्या अंगावर सरकार विरोधी मजकूर लिहिला होता. महिलांनी बैलांना सजवून आणले होते.

प्रतिक्रिया देताना आमदार यशोमती ठाकूर

बैलांच्या अंगावर 'वाढली आहे बेरोजगारी', 'शेती गेली तोट्यात', 'सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा चला करू नाश' अशा घोषणा देत महिलांनी या पोळ्यात सरकारचा निषेध केला. शेतकरी कर्जमाफी, भाजप सरकार नौकरीदार, धनगर आरक्षण विरोधी सरकार, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव द्या, शेतकरी विरोधी भाजप सरकार अशी घोषवाक्ये महिलांकडून बैलांच्या शिंगावर व पाठीवर लिहण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details