महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कपडे धुताना मुलगी बुडाली कालव्यात, शोध सुरू

तिवसामध्ये पाल टाकून मध्यप्रदेशातील मडिया कुटुंब वास्तव्याला आहे. जडीबुटी विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. या कुटुंबातील महिला आणि मुली आज कपडे धुण्यासाठी कालव्यावर गेल्या होत्या. कपडे धुताना मंदाकिनीचा तोल गेला आणि ती वाहून गेली.

drown
कपडे धुताना मुलगी बुडाली कालव्यात, शोध सुरू

By

Published : Feb 4, 2020, 9:27 PM IST

Updated : Feb 4, 2020, 9:34 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील तिवसा सातरगाव रोडवरील मुख्य कालव्यात दुपारी १३ वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली. मंदाकिनी सुबेदार मडिया असे या मुलीचे नाव आहे. बचाव पथकाच्या मदतीने तिवसा पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत.

कपडे धुताना मुलगी बुडाली कालव्यात, शोध सुरू

तिवसामध्ये पाल टाकून मध्यप्रदेशातील मडिया कुटुंब वास्तव्याला आहे. जडीबुटी विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. या कुटुंबातील महिला आणि मुली आज कपडे धुण्यासाठी कालव्यावर गेल्या होत्या. कपडे धुताना मंदाकिनीचा तोल गेला आणि ती वाहून गेली. कालवा तुडुंब भरला असल्याने सोबतच्या महिला तिला वाचवू शकल्या नाहीत.

हेही वाचा - औरंगाबादेत सातवीतील विद्यार्थिनीला शिक्षकानेच दाखवले पॉर्न व्हिडिओ; गुन्हा दाखल

माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. अमरावतीतील बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. पाण्याचा वेग जास्त असल्याने तुर्तास आजचे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. उद्या सकाळी पुन्हा मंदाकिनीचा शोध घेतला जाणार आहे. कालव्यातील पाणी कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - तेलंगणाच्या धरणाचा गडचिरोलीला फटका; मेडीगट्टाचे दरवाजे बंद केल्याने शेतात पाणी

Last Updated : Feb 4, 2020, 9:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details