अमरावती -अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील प्रस्थावित महेंद्र अभयारण्य मध्ये आज एक नर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. मृत घोड्याचे मास खाल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वन्य प्रेमींनी लावला आहे. बिबट्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शंका वर्तविण्यात येत असून उद्या या बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
महेंद्र अभयारण्य मध्ये एक बिबट्या हा मृत अवस्थेत आढळुन आला आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी वाघाने एका घोड्याची शिकार केली होती. त्यानंतर या घोड्यावर विषारी द्रव्य टाकले गेले असावे, त्यानंतर त्या घोड्याचे मास या बिबट्याने खाल्ले असेल. त्यातूनच त्याचा मृत्यू झाला असावा, असा कयास वन्य प्रेमींनी लावला आहे.
अमरावतीच्या वरुड तालुक्यात आढळला मृत अवस्थेत नर बिबट्या - leopard news
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील प्रस्थावित महेंद्र अभयारण्य मध्ये आज एका नर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.
मृत बिबट्या