महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत गुंडाराज ; दिवसाढवळ्या बार समोर तरुणावर प्राणघातक हल्ला - अमरावती तरूण प्राणघात हल्ला न्यूज

नवसारी परिसरात असलेल्या यश बार समोर सहाजणांनी एका तरूणाला मारहाण केली. आरोपींनी तरुणाला इतकी मारहाण केली की तो काही वेळ मरणासन्न अवस्थेत खाली पडला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या भूषणवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Attack on Boy
तरुणावर हल्ला

By

Published : Mar 30, 2021, 9:45 AM IST

अमरावती - शहरातील अचलपूर रस्त्यावरील नवसारी परिसरात असलेल्या यश बार समोर सहाजणांनी एका तरूणाला मारहाण केली. भूषण पोहकर(वय २१), असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. आरोपींनी जुन्या वादातून भूषणला लोखंडी रॉड, काठ्या, चाकू आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी सहा पैकी पाच आरोपींना अटक केली आहे.

बार समोर तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला
अमरावती शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांत हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २७ तारखेला अमरावती शहरातील नवसारी परिसरातील यश बार समोर तरुणाला मारहाणीची घटना घडली. आरोपींनी तरुणाला इतकी मारहाण केली की तो काही वेळ मरणासन्न अवस्थेत खाली पडला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या भूषणवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर अमरावती शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details