अमरावती - शहरात जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन एका ९५ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. या सकारात्मक गोष्टीमुळे आजीचे कौतुक करण्यात येत आहे.
सुखरूप परतल्या घरी
कौतुकास्पद! अमरावतीत ९५ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात - कोरोनावर मात
कोरोनाबाधित झाल्याने त्यांना १५ मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना आज (रविवार) घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. आजी घरी सुखरूप परतल्या असून त्यांची प्रकृती चांगली आहे. शिवाय वेळोवेळी उपचाराला साथ दिल्यामुळे त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
अमरावती आजी
मनकर्णाबाई कडू असे या आजींचे नाव असून त्या अचलपूर तालुक्यातील भुगाव येथील रहिवाशी आहेत. कोरोनाबाधित झाल्याने त्यांना १५ मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना आज (रविवार) घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. आजी घरी सुखरूप परतल्या असून त्यांची प्रकृती चांगली आहे. शिवाय वेळोवेळी उपचाराला साथ दिल्यामुळे त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.