महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! दहा महिन्यांत पश्चिम विदर्भातील 872 शेतकऱ्यांची आत्महत्या - तिवसा ताज्या बातम्या

बिनभरवशाची शेती आणि निसर्गाचा लहरीपणा या दुष्टचक्रात अडकून हताश झालेल्या पश्चिम विदर्भातील तब्बल ८७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

872-farmer-attempt-suicide-in-west-vidarbha
दहा महिन्यात पश्चिम विदर्भातील 872 शेतकऱ्यांची आत्महत्या

By

Published : Nov 3, 2020, 7:41 PM IST

अमरावती -सततची नापिकी, बोगस बियाणे, कर्जाचा डोंगर, त्यात बिनभरवशाची शेती आणि निसर्गाचा लहरीपणा या दुष्टचक्रात अडकून हताश झालेल्या पश्चिम विदर्भातील तब्बल ८७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे हताश झालेल्यातब्बल 51 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मागील १० महिन्यांत अमरावती २३३, अकोला १११, यवतमाळ २६५, बुलडाणा १८० तर वाशिममध्ये ७६ आत्महत्या झाल्या आहेत.

दरदिवशी तीन शेतकरी आत्महत्या

पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या पाच जिल्ह्यांत जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत तब्बल ८७२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. म्हणजेच, सरासरी दररोज तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यावर्षी तर निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सोबतच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्मत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत, निराश झालेल्या अनेकजण जीवन यात्रा संपवत आहेत.

रंगवलेले स्वप्न मातीमोल झाल्याने पांडुरंगची आत्महत्या

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील फत्तेपुर गावातील शेतकरी पांडुरंग मेटकर यांनी आत्महत्या केली. पांडुरंग यांच्याकडे पाच एकर शेती आहे. सुरवातीला त्यांनी दोन एकर सोयाबीन पेरले पण बियाणे बोगस निघाल्याने हाती काहीच लागले नाही. नंतर पुन्हा कर्ज काढून सोयाबीन पेरले. तसेच उर्वरित तीन एकरात कपाशीही पेरली; परंतु सोयाबीनवर खोडकीड आणि कपाशीवर बोंडअळी आल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन एकर शेतात झालेल्या तीन क्विंटल सोयाबीनचे केवळ १२ हजार रुपये हाती आले. त्यामुळे पांडुरंग यांनी रंगवलेले स्वप्न मातीमोल झाले आहे. बँकेचे ५० हजाराचे कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत पांडुरंग घरातून निघाले आणि शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पांडुरंग मेटकर यांच्या वडीलांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details