अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वासनी जलसंपदा प्रकल्पाला सुधारित मान्यता देऊन त्यांच्या कामांना वेग देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. वासनी मध्यम प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी आवश्यक खर्चास मान्यता मिळण्याबाबत आमदार श्री. कडू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार मान्यता मिळाल्याने प्रकल्पाचे काम गती घेणार आहे.
जिल्ह्यातील ४ हजार ३१७ हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ :आमदार श्री. कडू म्हणाले की, अचलपूर तालुक्यातील १६, दर्यापूर तालुक्यातील ४ व अंजनगांव तालुक्यातील ३ गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. या प्रकल्पास २००८-०९ मध्ये सुरुवात झाली. भूसंपादन, पुनवर्सन आदी बाबींचा खर्चामुळे प्रकल्प किमतीत वाढ झाली.वाढीव किमतीस मान्यता नसल्याने प्रकल्प २०१७ पासून बंद होता. शासनाने आता सुधारित खर्चास मान्यता दिल्याने प्रकल्पाचे काम वेग घेणार आहे.