महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्नातील जेवणातून 70 जणांना विषबाधा; धारणी तालुक्यातील प्रकार - भवर

भवर गावामध्ये एका लग्न सोहळामध्ये जेवण केल्यानंतर जवळपास 70 लोकांना विषबाधा झाली आहे. या विषबाधा झाल्यानंतर सर्व लोकांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला.

लग्नातील जेवणातून 70 जणांना विषबाधा; धारणी तालुक्यातील प्रकार

By

Published : May 11, 2019, 11:05 PM IST

Updated : May 11, 2019, 11:23 PM IST

अमरावती- मेळघाटातील धारणी तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या भवर गावामध्ये एका लग्न सोहळामध्ये जेवण केल्यानंतर जवळपास 70 लोकांना विषबाधा झाली आहे. या विषबाधा झाल्यानंतर सर्व लोकांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांची परिस्थिती खालवत चालल्याने त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साद्राबाडी येथे दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर तेथेही त्यांची परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे स्थानंतरीत करण्यात आले आहे.

बाधित रुग्णांवर उपचार सुरू असताना


भवर गावमध्ये आज एका लग्नामध्ये दुपारचे जेवण केल्यानंतर जवळपास 70 जणांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला. यामध्ये लहान मुलांपासून पुरुष तर काही महिलांचा सुद्धा समावेश आहे. त्याच्यावर सद्या उपजिल्हा रुगणालय येथे उपचार सुरू आहेत.

Last Updated : May 11, 2019, 11:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details