अमरावती - मेळघाटच्या धारणी तालुक्यातील भवर गावात तब्बल ७० जणांना मटणाच्या भाजीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. दूषित पाण्यातून मटणाची भाजी बनवल्यामुळे ही विषबाधा झाली असल्याची माहिती आहे. शनिवारी ११ एप्रिलला ही घटना घडली आहे.
भवर गावातील रामप्रसाद भिलावेकर यांच्या मुलीचे १० मे राजी लग्न झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी 'किबला बिदाई' प्रथेनुसार पाहुण्यांना मटणाचे जेवण देण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणेच ११ मे रोजी मटणाची भाजी बनवण्यासाठी टवाला नदीचे साठलेले पाणी वापरण्यात आले. या ठिकाणी २०० वऱ्हाड्यांनी मटणाच्या भाजीवर ताव मारला. त्यापैकी ७० जणांना विषबाधा झाली असून या सगळ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.