अमरावती- मूळच्या अमरावती जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या एका मुख्यध्यापकाचा बुलडाणा जिल्ह्यात मृत्यू झाला होता. मुख्यध्यापकाचे अंत्यसंस्कार झाल्यावर त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर मुख्यध्यापकाच्या अत्यसंस्कारसाठी बुलडाण्यात आलेल्या त्याच्या ६ नातेवाईकांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
बुलडाणा येथील कोरोनाबाधित मृतकाच्या ६ नातेवाईकांसह एकाचे विलगीकरण - headmaster died corona buldana
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील रिद्धपूर येथील व्यक्ती बुलडाण्यातील एका शाळेत मुख्यध्यापक पदावर कार्यरत होती. या मुख्यध्यापकाचे २९ मार्च रोजी निधन झाले होते. मुख्यध्यापकाच्या अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे उघड झाले होते.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील रिद्धपूर येथील व्यक्ती बुलडाण्यातील एका शाळेत मुख्यध्यापक पदावर कार्यरत होती. या मुख्यध्यापकाचे २९ मार्च रोजी निधन झाले होते. मुख्यध्यापकाच्या अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे उघड झाले होते. दरम्यान, या व्यक्तीच्या अंतयात्रेत अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील त्याचे ४ नातेवाईक सहभागी झाले होते. तर, अमरावती शहरात वास्तव्यास असणाऱ्या त्याच्या २ बहिणीही अंतयात्रेत सहभागी झाल्या होत्या. यासोबतच मृत व्यक्तीच्या शाळेतील एका शिक्षकाचा नातेवाईक, जो अमरावतीचा रहिवासी आहे, त्याचा मृत व्यक्तीशी बुलडाणा ते दारव्हा आणि दारव्हा ते बुलडाणा या प्रवासादरम्यान संपर्क आला होता. या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा-बुलडाण्यातील 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह मृतकाच्या परिवारातील आणखी दोनजण कोरोनाबाधित