अमरावती -एसएसटी पथक (स्थिर निरीक्षण पथक) प्रमुख सतिश गोसावी यांच्या नेतृत्वात बायपास चेकपोस्टवर तपासणी करण्यात आली. यात गुरुवारी रात्री एका संशयित चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. यात ७ लाख १३ हजार ७५० रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
अमरावतीत चांदूर रेल्वे बायपास चेक पोस्टवर ७ लाखांची रोकड जप्त - maharastra assembly election 2019 news
चांदूर रेल्वे अमरावती रोडवर बायपासजवळ निवडणूक विभागातर्फे जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे चेकपोस्ट लावण्यात आले आहे. या ठिकाणी नेमलेल्या स्थिर निगराणी पथकाद्वारे येणार्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
हेही वाचा-मायक्रोसॉफ्टच्या सीईओ सत्या नाडेलांचे वार्षिक वेतन 300 कोटी रुपये!
चांदूर रेल्वे अमरावती रोडवर बायपासजवळ निवडणूक विभागातर्फे जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे चेकपोस्ट लावण्यात आले आहे. या ठिकाणी नेमलेल्या स्थिर निगराणी पथकाद्वारे येणार्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अशातच काल गुरुवारी रात्री १२ वाजता महिंद्रा एक्सयुव्ही वाहन (एमएच २७ बीई ५९५४) याची तपासणी करण्यात आली. धामणगाव रेल्वे येथील संदेश कुचेरीया यांच्या मालकीचे हे वाहन आहे. यातील बॅगमध्ये ७ लाख १३ हजार ७५० रुपये रोख रक्कम आढळून आली आहे. यामध्ये दोन हजार रुपयाच्या १२ नोटा, दोनशे रुपयाच्या ११९ नोटा, शंभर रुपयाच्या ७६३ नोटा, पाचशे रुपयाच्या ११६२ नोटा व पाचशे रुपयाच्या १७३ नोटा होत्या.ही रक्कम धामणगाव रेल्वे येथील मेडीकल व्यवसायीक गोपाल पुंडलिकराव लोंदे यांच्या मेडिकल दुकानाची असल्याचे सांगितले. परंतु, मोक्यावर यांच्याकडे सदर रकमेबाबत कुठलाही पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे ही रक्कम पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त करण्यात आली. चांदूर रेल्वे येथील उपकोषागार कार्यालय येथे जमा करण्यात आली.