महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती: एक्दरा गावात अग्नितांडव; गायींचे जळाले सात गोठे - cowshed fire in Amaravati

आग लागली असताना गोठ्यातील सर्व जनावरे बाहेर निघाल्याने अनर्थ टळला. आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

7 cowsheds destroyed
एक्दरा गावात अग्नितांडव

By

Published : Apr 10, 2021, 10:22 PM IST

अमरावती -जिल्ह्यात वरुड तालुक्यातील एकदरा येथील नागमोते लेआऊटमध्ये अचानक दुपारी दोन वाजण्याच्यादरम्यान आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केल्याने एकापाठोपाठ सात गोठे भस्मासात झाले. यामधे एका कालवड ठार झाली. तर एक जखमी आहे.

आग लागली असताना गोठ्यातील सर्व जनावरे बाहेर निघाल्याने अनर्थ टळला. आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

हेही वाचा-अजित पवारांचे राजकारण चुलत्याच्या जीवावर - गोपीचंद पडळकर

जनावरांचा चार जाळून खाक

तालुक्यातील एकदरा येथे नागमोते ले आऊटमध्ये शनिवारच्या दुपारी दोन वाजता अचानक आग लागली. यामध्ये गोठ्याला लागलेल्या आगीमध्ये राजेश पावडे यांच्या गोठ्यातील कालवड जळून ठार तर एक कालवड भाजली असून गंभीर जखमी आहे. तर वासुदेव राऊत, वासुदेव वहेकर , रामकृष्णा चौधरी, रवी ठाकरे, प्रकाश चौधरी, अशोक राऊत व मनोहर मांडे यांचे गोठे जळून खाक झाले. तर या लागलेल्या आगीमधे लाखो रुपयांचे शेतीपयोगी साहीत्य व जनावरांचा चारा जळून नष्ट झाला आहे.

हेही वाचा-VIDEO : ''डान्स करणे म्हणजे जिहाद नव्हे'', धर्मांध वकिलाला विद्यार्थ्यांचे अनोखे उत्तर

मोठा अनर्थ टाळला-

घटनेची माहीती मिळताच वरुड व शेंदुरजनाघाट नगरपरिषदेच्या अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रन मिळविले. यामुळे संभाव्य अनर्थ टळला. यावेळी गोठ्यातील जनावरांना बाहेर काढण्यात नागरिकांना यश आल्याने प्राणहानी टळली. गावकऱ्यांनीसुद्धा आग विझविण्यासाठी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचे प्रयत्न केले. यावेळी घटनास्थळी आमदार देवेंद्र भुयार, ऋषिकेश राऊत , तहसीलदार किशोर गावंडे, ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी घटना स्थळावर जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

ABOUT THE AUTHOR

...view details