महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत ७ कोरोना रुग्णांची वाढ; एकूण संख्या १५२ वर - Corona virus news Amravati

अमरावतीत शनिवारी 7 कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने एकूण रुग्णांची संख्या 152 वर पोहोचली असून हा आकडा झपाट्याने वाढतो आहे.

7 corona patient increased in amravati
अमरावतीत ७ नव्या कोरोना रुग्णांची भर

By

Published : May 24, 2020, 10:28 AM IST

अमरावती- जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात एकूण ७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. अमरावतीत आता कोरोनारुग्णांची संख्या 152 वर पोहोचली आहे. कोव्हिड रुग्णालयात कार्यरत कम्युनिटी हेल्थ ऑफिसरलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

शनिवारी एकूण ११२ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून यापैकी ७ जणांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी अकोला येथील मूळ रहिवासी असणारा 28 वर्षीय युवक हा कोव्हिड रुग्णालयात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून गत काही दिवसांपासून सेवा देत होता. त्यालाही कोरोनाने ग्रासले असल्याने त्याच्या सहकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मसानगंज परिसरातील 75 वर्षीय पुरुष,18 वर्षीय युवक, हजरत बिलाल नगर येथील 52 वर्षीय पुरुष, खुर्शीदनगर येथील 42 वर्षीय पुरुष, रतनगंज परिसरातील 52 वर्षीय पुरुष आणि हबीब नगर परिसरातील 32 वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळून आले आहे.

अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या 152 वर पोहोचली असून हा आकडा झपाट्याने वाढतो आहे. कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यास अमरावती जिल्हा प्रशासन अपयशी ठरले असून हवे तसे गांभीर्य अधिकाऱ्यांनी दाखविले नसल्याने कोरोचे संकट अमरावती अधिक गडद होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details